बहमनी सत्ता
बहमनी सत्ता : (इ. स. १३४७-१५३८). मध्ययुगात द. भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. चौदाव्या शतकात द. भारतावर दिल्लीच्या मुहंमद तुघलकाचा अमंल होता. त्याच्या विरूद्ध इ. स. १३२७ पासून बंडाळीला सुरूवात झाली होती. ती शमविण्यासाठी मुहंमद तुघलक याने दक्षिणेतील अमीरांना विश्र्वासघाताने ठार मारण्याचा कट रचला; पण तो उघडकीस येऊन सुलतानाने पाठविलेल्या दूतासच ठार मारण्यात आले